Posts
Showing posts from May, 2025
दोन डोळे वाट पाहणारे....
- Get link
- X
- Other Apps
आजच्या धावपळीच्या जगात घरातली तरुण मंडळी कामात busy असतात आणि त्यांचे वयस्कर आई वडील आणि लहान लेकर घरी वाट पाहतात त्यासाठी या छोट्याशा चारओळी........प्राज ----------------------------------------------- दोन डोळे वाट पाहणारे.... दोन डोळे थकलेले वाट पाहणारे संध्याकाळी आपल्या चिमण्या पाखरानी आपल्याशी बोलावे एवढीच माफक अपेक्षा असणारे प्रेमासाठी आसुसलेले.... दोन डोळे थकलेले वाट पाहणारे || दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे आई बाबाची वाट पाहून थकून निजणारे... तरीही भेटीची आस असणारे... दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे || प्राज ❤️
निसर्ग आणि कृत्रिम जग
- Get link
- X
- Other Apps
या कृत्रिम जगात हळूहळू निसर्ग देखील हरवत चाललाय.... जणू काही हा सूर्या विजेच्या खांबाला जाऊन चिकटलाय....किती विडंबना आहे मित्रांनो या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय.... या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय.... प्राज ता. क. Photo सौजन्य चि.आर्य ( भावाचा मुलगा ) त्यानी काढलेला हा सहज़ क्लीक आणि त्यावर सूचलेल्या या चार ओळी... 😊🙏🏻
स्त्री......👩👩🎓👩🏫🧑🍳👩🌾
- Get link
- X
- Other Apps
स्त्री स्त्री एखाद्या सूंदर नदी सारखी असते..... शांत, अवखळ, निखळ प्रवाहा बरोबर वाहण हा तिचा मूळचा स्वभाव.... पण जस नदीने मर्यादा ओलंडली की गावच्या गांव उद्धवस्त होतात तस एखाद्या स्त्री ने मर्यादा सोडली घर उद्धवस्त होत..... कुटुंबासाठी ती खुप गोष्टी करत असते.... त्यातच खुपदा ती कुटुंबा कडूनच दुखावली जाते..... पण त्याच कुटुंबा वर संकट आल तर ढाल बनुन कुटुंबाच रक्षण करते....कोणी नाही ओळखू शकत स्त्री मना ला..... आई म्हणून प्रेमळ.. तितकीच मुलांवर संकट आल तर वघिण....अश्याच काही कथा मध्ये मध्ये आपण माझ्या ब्लॉग मध्ये वाचू शकता.... तर असाच प्रतिसाद देत रहा .....धन्यवाद
ते २५ दिवस
- Get link
- X
- Other Apps
अनेक वेळा मजे मजेत आपण म्हणतो की अन्न , वस्त्र , निवारा बरोबरच आता मोबाईल देखील आपली जीवनावश्यक गरज बनली आहे ...तर हो खरच ...याचा अनुभव मी घेतला आहे गेले जवळ जवळ २५ दिवस मी मोबाईल मुळे हैराण झाले होते.. माझा मोबाईल अचानक बंद पडला ...आणि सुरू झाले हे भयाण नाट्य ...भयाण अश्यासाठी की खूप गोष्टी साठी आपण या मोबाईलवर अवलंबून असतो ....जस ऑनलाईन बुकींग , payments , calling , map location असे अजून बरेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम calling चा यायचा घरच्याशी संपर्क किंवा call करायचा म्हणल की कोणाकडे तरी फोन मागा आणि मग call करा....इथून सुरवात झाली ... मग हळूहळू अडचणी वाढत गेल्या जस ऑनलाईन payment मुळे कॅश जवळ ठेवायची सवय राहिली नव्हती...आता बँकेतून कॅश काढून आणली ती पुरवून वापरा ...नाहीतर पुन्हा ATM जाऊन कॅश काढा ....बाहेर कुठे गेलो आणि काही खरेदी करायची असेल तर खात्री असायची आपण ऑनलाईन pay करु शकतो....पण फोन बंद असेल तेव्हा फार अडचणी येतात.., कुठे जायचं म्हणल तर गुगल map लावा आणि निघा तसेच ऑनलाईन बुकीग जस ola, Uber यातही अडचणी येऊ लागल्या.... हल्ली ...
भावंडं......
- Get link
- X
- Other Apps
एकतरी भावंडं असावं ज्याच्याशी हितगूज शेअर करावं एकतरी भावंडं असावं ज्याच्याजवळ रडाव , मन मोकळं करावं एकतरी भावंडं असावं ज्याच्याशी भांडाव आणि तूच चुकलास म्हणून दोषी धरावं एकतरी भावंडं असावं ज्याच्याशी आपल सुखदुःख शेअर करावं एकतरी भावंडं असावं जिथे तुझं माझं नाही जे आहे ते आपल असावं.... प्राज ( प्राजक्ता धडफळे )
...... कारण ती आई असते....
- Get link
- X
- Other Apps
खराटा...फूलझाड़ू....ssss असा आवाज आला... तशी मी बाहेर आले.... साधारण दुपारी 11ची वेळ असेल... वयानी लहान , सड़पातळ बांधा असलेली अंगावर जूनी पण नेटकी साड़ी असणारी, रंगानी सावळी पण नाकी डोळी नीटस अशी एक स्त्री समोर आली.. ताई झाड़ू घ्या..... सकाळ पासून बोनी न्हाई झाली चांगली किंमत लावतिया... अस बोलून ती दारापुढे ठिय्या देऊनच बसली.... ऊन खुप होत...तिला पाणी दिल..... तशी बोलू लागली ..... ताई "लई लांबुन आलिया... नवरा दारु पिऊन कर्जबाजारी झाला.... अन् आत्महत्या केली बघा.... त्यानं आत्महत्या केली म्हनून आपल्याला न्हाई करता येणार तस.... लेकरं माझी उघड्यावर पडली असती.. दोन मूली आहेत पदरात..कधी बिगारी काम करत्यात तर कधी शेतावर मजूरी करतात.. मिळल त्ये काम करतात बघा ..काय करणार ताई.. ..एक मुलगा बी हाये लहान हाय लेकरू.. तान्ह हाय आमच बगा असं घरोघरी या गावोंगावी फिरून काम असत बगा.. हातावरच पोट आमचं त्यामुळे त्याला शाळेलां घालता येत नाय..... कमी वयातच खुप दुनियादारी पाहिली ताई..... पर नवरा गेला तस ठरवल बगा ...
शब्दांच वजन
- Get link
- X
- Other Apps
शब्दांच वजन ..... तुम्ही म्हणाल हे काय नवीन तर प्रसंग असा घडला आमच्या बिल्डिंग मधील पाचवीतील मुलगा कोरी वही घेऊन किराणामाल च्या दुकानात आला... काही समजायच्या आत त्याने त्याची वही वजन काट्यावर ठेवली....आणि बोलला की मला वहीचं वजन करायचं आहे. थोड्या प्रश्नार्थक नजरेनं आम्ही त्याच्याकडे बघितलं....आम्ही समजलो की लहान मुलांचे खेळ असतात ना तसा हा पण एक काहीतरी खेळ असेल..... पण पुढे त्याने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून आम्ही अवाकच झालो .....तो म्हणाला आता मी या वहीत लिहिणार , अभ्यास करणार मला बघायचं आहे की मी लिहिल्या नंतर वहीचं वजन किती वाढतंय....मला मी लिहिलेल्या शब्दांच वजन कळेल... असं बोलत बोलत त्याने वहीच्या पाठीमागे कोपऱ्यात वहीचं आताचं वजन लिहिलं.... विचार किती साधा आहे पण आपण कधी केलाच नव्हता. आपल्या दृष्टीने शब्दांच वजन म्हणजे फक्त कुठे तरी वशिला लावताना...किंवा कोणत तरी काम करून घेण्यासाठी..... कोण्या बड्या अधिकारी किंवा मोठा व्यक्ती यांच्या शब्दांच पडणार वजन असेच इतके दिवस धरून चालत होतो . पण या निरागस जीवानं मला एक नवीन " शब्दांच्या वजनाची " व्याख्या नकळत समजावून दि...
राजे...... तुम्ही परत या...
- Get link
- X
- Other Apps
जय शिवराय राजे आज तुम्ही असतात तर..... पण विचार येतो कोणत्या तोंडानी स्वागत करणार तुमचं? ज्या वयात तुम्ही स्वराज्यासाठी लढलात, त्या वयाची आजची पिढ़ी व्यसनांच्या आहारी जात आहे. तुमच्या राज्यात आया,बहिणी सुरक्षित होत्या.... पण आज आई बहीणच काय बालिका सुद्धा सुरक्षित नाही. शत्रुच्या स्त्रीचा सुद्धा तुम्ही सन्मान केलात.... पण आज घरातली स्त्रीच अपमानित आहे. सांगा राजे अशा राज्यात कस स्वागत करायच तुमच? कस स्वागत करायच तुमच? 😞🙏🏻एकच खंत वाटते..... तुमच्या जन्मदिनी.... "असा राजा होणे नाही "..... राजे तुम्ही परत या आम्हाला खरंच गरज आहे तुमची..... 🙏🏻🙏🏻 प्राज....
मी.... स्वतः......
- Get link
- X
- Other Apps
मी Hello everyone..... माझा हा पहिलाच blog आहे.... खुप साध सोप आयुष्य आहे माझ घर, मूल, सासु सासरे एक मध्यम वर्गीय कुटुंब.....आजपर्यंत कुटुंबाची जबाबदारी पार पाड़ता पाड़ता.... आपल्या सगळ्या छंदाना मुरड घातली. आज मूल मोठी आहेत तेव्हा आता थोड़ा वेळ मिळाला तर तो सत्कारणी लावायचा ठरवला. तरी तुम्ही सगळे माझा blog जरूर वाचत जा. धन्यवाद 🙏🏻