या कृत्रिम जगात हळूहळू निसर्ग देखील हरवत चाललाय.... जणू काही हा सूर्या विजेच्या खांबाला जाऊन चिकटलाय....किती विडंबना आहे मित्रांनो या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय.... या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय....
प्राज
ता. क. Photo सौजन्य चि.आर्य ( भावाचा मुलगा ) त्यानी काढलेला हा सहज़ क्लीक आणि त्यावर सूचलेल्या या चार ओळी... 😊🙏🏻
आजच्या धावपळीच्या जगात घरातली तरुण मंडळी कामात busy असतात आणि त्यांचे वयस्कर आई वडील आणि लहान लेकर घरी वाट पाहतात त्यासाठी या छोट्याशा चारओळी........प्राज ----------------------------------------------- दोन डोळे वाट पाहणारे.... दोन डोळे थकलेले वाट पाहणारे संध्याकाळी आपल्या चिमण्या पाखरानी आपल्याशी बोलावे एवढीच माफक अपेक्षा असणारे प्रेमासाठी आसुसलेले.... दोन डोळे थकलेले वाट पाहणारे || दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे आई बाबाची वाट पाहून थकून निजणारे... तरीही भेटीची आस असणारे... दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे || प्राज ❤️
स्त्री स्त्री एखाद्या सूंदर नदी सारखी असते..... शांत, अवखळ, निखळ प्रवाहा बरोबर वाहण हा तिचा मूळचा स्वभाव.... पण जस नदीने मर्यादा ओलंडली की गावच्या गांव उद्धवस्त होतात तस एखाद्या स्त्री ने मर्यादा सोडली घर उद्धवस्त होत..... कुटुंबासाठी ती खुप गोष्टी करत असते.... त्यातच खुपदा ती कुटुंबा कडूनच दुखावली जाते..... पण त्याच कुटुंबा वर संकट आल तर ढाल बनुन कुटुंबाच रक्षण करते....कोणी नाही ओळखू शकत स्त्री मना ला..... आई म्हणून प्रेमळ.. तितकीच मुलांवर संकट आल तर वघिण....अश्याच काही कथा मध्ये मध्ये आपण माझ्या ब्लॉग मध्ये वाचू शकता.... तर असाच प्रतिसाद देत रहा .....धन्यवाद
प्राजक्त...... नसे कधी आसक्त तो प्राजक्त......कोमल तरी सशक्त तो प्राजक्त......परमेश्वरा चरणी भक्त तो प्राजक्त......भगवे पांढरे वस्त्र लेवुनी असे विरक्त तो प्राजक्त....... praj
Comments
Post a Comment