ते २५ दिवस
अनेक वेळा मजे मजेत आपण म्हणतो की अन्न , वस्त्र , निवारा बरोबरच आता मोबाईल देखील आपली जीवनावश्यक गरज बनली आहे ...तर हो खरच ...याचा अनुभव मी घेतला आहे गेले जवळ जवळ २५ दिवस मी मोबाईल मुळे हैराण झाले होते..
माझा मोबाईल अचानक बंद पडला ...आणि सुरू झाले हे भयाण नाट्य ...भयाण अश्यासाठी की खूप गोष्टी साठी आपण या मोबाईलवर अवलंबून असतो ....जस ऑनलाईन बुकींग , payments , calling , map location असे अजून बरेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम calling चा यायचा घरच्याशी संपर्क किंवा call करायचा म्हणल की कोणाकडे तरी फोन मागा आणि मग call करा....इथून सुरवात झाली ...
मग हळूहळू अडचणी वाढत गेल्या जस ऑनलाईन payment मुळे कॅश जवळ ठेवायची सवय राहिली नव्हती...आता बँकेतून कॅश काढून आणली ती पुरवून वापरा ...नाहीतर पुन्हा ATM जाऊन कॅश काढा ....बाहेर कुठे गेलो आणि काही खरेदी करायची असेल तर खात्री असायची आपण ऑनलाईन pay करु शकतो....पण फोन बंद असेल तेव्हा फार अडचणी येतात..,
कुठे जायचं म्हणल तर गुगल map लावा आणि निघा तसेच ऑनलाईन बुकीग जस ola, Uber यातही अडचणी येऊ लागल्या....
हल्ली सगळे मेसेजेस गृपवर येतात त्यामुळे शाळेच्या ग्रुपवर येणारी माहितीसाठी कुणावर तरी अवलंबून रहाव लागायचं .... हद्द तिथे झाली जेव्हा मी मैत्रीणीना reply दिला नाही तेव्हा त्या घाबरून गेल्या की हिच्या बाबतीत काय झालं असेल .. आपल अस्तित्व सुद्धा या मोबाईलवर अवलंबून झालय...
अस करत विचार केला की किती आहारी गेलोय आपण या फोन च्या तो बंद पडला तर जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेलीये असा feel यायला लागलाय......
नवीन फोन घेतला पण पुन्हा जंग जारी सगळे जुने applicatios , फोटोज् , messages त्यात घेणं ...missing AAP एक ना अनेक...बरोबर का चूक ते माहिती नाही पण ......
" mobile is a part of our life " अस न होता
" life is a part of our mobile " असं थोडंसं झालय ...
हे प्रत्येकाच्या बाबतींत applicable होईलच असे नाही पण विचार करायला लावण्या सारखं आहे ... ......
Praj
खरंच आहे हे मोबाइल हा अविभाज्य घटक बनला आहे आपल्या आयुष्यात
ReplyDelete