शब्दांच वजन

 शब्दांच वजन .....

तुम्ही म्हणाल हे काय नवीन तर प्रसंग असा घडला आमच्या बिल्डिंग मधील पाचवीतील मुलगा कोरी वही घेऊन किराणामाल च्या दुकानात आला... काही समजायच्या आत त्याने त्याची वही वजन काट्यावर ठेवली....आणि बोलला की मला वहीचं वजन करायचं आहे. थोड्या प्रश्नार्थक नजरेनं आम्ही त्याच्याकडे बघितलं....आम्ही समजलो  की लहान मुलांचे खेळ  असतात ना तसा हा पण एक काहीतरी खेळ असेल.....

पण पुढे त्याने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून आम्ही अवाकच झालो .....तो म्हणाला आता मी या वहीत लिहिणार , अभ्यास करणार मला बघायचं आहे की मी लिहिल्या नंतर वहीचं वजन किती वाढतंय....मला मी लिहिलेल्या शब्दांच वजन कळेल... असं बोलत बोलत त्याने वहीच्या पाठीमागे कोपऱ्यात वहीचं आताचं वजन लिहिलं....

विचार किती साधा आहे पण आपण कधी केलाच नव्हता. आपल्या दृष्टीने शब्दांच वजन म्हणजे फक्त कुठे तरी वशिला लावताना...किंवा कोणत तरी काम करून घेण्यासाठी..... कोण्या बड्या अधिकारी किंवा मोठा व्यक्ती यांच्या शब्दांच पडणार वजन असेच इतके दिवस धरून चालत होतो . पण या निरागस जीवानं मला एक नवीन " शब्दांच्या वजनाची " व्याख्या  नकळत समजावून दिली.....

प्राजक्ता धडफळे ( प्राजं )

Comments