सावध हरिणी सावध ग
सावध हरणी सावध ग Blog लिहायला सुरवात केलिए खर...... विषयही ' स्त्री'हा निवडला खुप विचारांची गर्दी झाली कारण बघायला गेल तर विषय तसा सोपाही आहे आणि अवघड़ही......स्त्री ला समजण इतक सोप नाही......ही स्त्री आपल्या अवती भावतिचीच असणार आहे.... चला तर सुरवात करुयात.... 👍🏻 आजची जी स्त्री आहे तीच नाव "असावारी " माझ्यासोबत बस ने प्रवास करणारी.तीच ऑफिस माझ्या ऑफिस च्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये होत रोज एकत्र प्रवास करताना तोंड ओळख झाली आणि मग गर्दी असताना एकमेकीन साठी जागा पकड़न वैगरे चालू झाल....ओळख मैत्रीत बदलली... असावरीच्या घरी आई -वडील, बहिण आणि लग्न झालेला भाऊ आणि त्याची एक 5 वर्षाची मुलगी.... सगळ छान चालेल बहिणी च लग्न ठरल तस लगीन घाई चालू झाली...खरेदीची लगबग सुरु झाली. खरेदीला बहिणी सोबत असावरी जाऊ लागली अशीच खरेदीला गेली असताना एका लेडीज स्टोअरमध्ये...