जबाबदारी
जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत कुणाला लहान वयातच आई वडिलांच्या जागी नेऊन ठेवत जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत छोट्या हातानाही घरासाठी राबायला लावत जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत स्वतः साठी कमी दुसऱ्यासाठी जगायला भाग पाडत जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत आपल्या स्वप्नांची होळी करून त्या विस्तवावर भुकेसाठी भाकरी भाजायला लावत ... जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत सगळ्यांसाठी कितीही केलं तरी नमत नेहमी आपल्यालाच घ्यावं लागत जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत हा आहे काटेरी मुकुट वरून चमकता पण आतून रक्तबंबाळ झालेला ...पण आतून रक्तबंबाळ झालेला जबाबदारीच ओझं खूप गोष्टी शिकवत ..... Praj