Posts

Showing posts from July, 2023

" फिटे अंधाराचे जाळे "

आज एका सामान्य मुलीची कथा ऐकणार आहोत......." रेवा " तिच नाव.... रेवा एका मध्यमवर्गीय घरातली  मुलगी .रेवा दिसायला अतिशय  सूंदर.आई,वडील, भाऊ आणि ती...अस छोटस  चौकोनी  कुटुंब. वडिलांचा एका कंपनीत जॉब, आई गृहिणी आणि भाऊ कॉलेज student...रेवा 10 वी पास झाली  कॉलेजला एडमिशन घेतली थोड्या काळातच मित्र मैत्रीणी  झाल्या..... त्यातच  रितेश नावाचा मुलगा होता. मीडियम उँचीचा , कुरळे केस असणारा, गोरा  रंग,सदा हसतमुख आणि चेहऱ्या ने अतिशय  इनोसेंट दिसणारा रितेश सगळ्या ग्रुपचा अल्पावधीतच लाड़का बनला. साधारण 12 वीला असताना रितेश ने रेवाला प्रपोज केल... तीने लगीच होकार दिला नाही...12 विची  परीक्षा झाली  आणि तिने रितेश  ला होकार दिला.... मज़ाक मस्ती करत  कॉलेजचे ते सोनेरी दिवस संपले. रेवा तशी practical करियर, फ्यूचर याबाबतीत थोड़ी particular होती. रितेश अजूनही अवखळ अल्लड असाच  होता . वडिलांची travel agency आणि आईचे private टूशन  आणि हा एकुलता एक मुलगा. यात  जबाबदारी त्यानी कधी घेतलीच नाही. शिक्षण  पूर्ण झाल दोघही जॉबला लागले pr...