आठवणी





 स्टेटस ला हा फोटो लावला आणि विचारलं या फोटोतल्या वस्तूंविषयी काही आठवणी असतील तर जरूर सांगा....तर एका काकूंनी आवर्जून फोन करून त्यांची आठवण सांगितली ती पुढील प्रमाणे....

त्या काकुंचं जेव्हा लग्न ठरल म्हणजे साधरण ७०साल ची गोष्ट.... त्यांचे आई वडील त्यांच्या नियोजित पतीच घर बघायला गेले होते ...त्याच्या घरी वरील फोटोतला टेपरेकॉर्डर होता....बैठक झाली ...घरी येऊन आई वडिलांनी त्यांना (त्या काकूंना ) सांगितल की मुलाच्या घरी टेपरेकॉर्डर आहे ..त्याकाळी घरी टेपरेकॉर्डर असण म्हणजे prestigious issue होत.त्या काकूंनाही गाणी ऐकायला आवडायची ....ते काका २ वर्षापूर्वी वारले ....आयुष्य पुढे सरकत जात पण छोट्या छोट्या आठवणी कायम साठून असतात हृदयाच्या चोर कप्प्यात...अशीच त्यांच्या आयुष्यातली एक सोनेरी आठवण ....

Comments

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....