...... कारण ती आई असते....

खराटा...फूलझाड़ू....ssss 
 असा आवाज  आला... 
तशी मी बाहेर आले....
साधारण दुपारी 11ची वेळ असेल...
वयानी लहान , सड़पातळ बांधा असलेली अंगावर जूनी पण नेटकी साड़ी असणारी, रंगानी सावळी पण नाकी डोळी नीटस अशी एक स्त्री समोर आली..
ताई झाड़ू घ्या..... सकाळ पासून बोनी न्हाई झाली चांगली किंमत लावतिया... अस बोलून ती दारापुढे ठिय्या देऊनच बसली....
ऊन खुप होत...तिला पाणी दिल.....
तशी बोलू लागली .....
ताई  "लई लांबुन आलिया... नवरा दारु पिऊन कर्जबाजारी झाला.... अन् आत्महत्या केली बघा.... त्यानं आत्महत्या केली म्हनून आपल्याला न्हाई करता येणार तस.... लेकरं  माझी उघड्यावर पडली असती..
 दोन मूली आहेत पदरात..कधी बिगारी काम करत्यात 
तर कधी शेतावर मजूरी करतात..  मिळल त्ये काम करतात बघा ..काय करणार ताई..
..एक मुलगा बी हाये लहान हाय लेकरू.. तान्ह
हाय 
 आमच बगा असं घरोघरी या गावोंगावी फिरून काम असत बगा..
हातावरच पोट आमचं 
त्यामुळे त्याला शाळेलां घालता येत नाय.....
कमी वयातच खुप दुनियादारी पाहिली ताई.....
 पर नवरा गेला तस ठरवल बगा 
कि या लेकरांसाठी जगावं लागेल मला..
त्यांचा बाप त्यांना सावली नाय देऊ शकला
 पण मी देइन त्यांना बाप नावाच छप्पर....... 

चला जाऊ का ताई... येती हा म्या..,"
 मी दिलेले झाड़ूचे पैसे चंची मध्ये ठेवत तिने तिचं 
जड़ बोचकं उचललं.. आणि आवाज देत ती निघून गेली.....
खराटा, फूलझाड़ू.... ssss
तिच्या पाठमोऱ्या आकृती कड़े बघत असताना मनात विचार आला .... 
 काही पुरष परिस्थिति पुढे हरतात पण स्त्री परिस्थिति पुढे उभी राहते 
 सहज़ हार मानत नाही 
कारण ती " आई " असते....
कारण ती "आई " असते......
प्राज

Comments

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....