" फिटे अंधाराचे जाळे "

आज एका सामान्य मुलीची कथा ऐकणार आहोत......." रेवा " तिच नाव....
रेवा एका मध्यमवर्गीय घरातली  मुलगी .रेवा दिसायला अतिशय  सूंदर.आई,वडील, भाऊ आणि ती...अस छोटस  चौकोनी  कुटुंब. वडिलांचा एका कंपनीत जॉब, आई गृहिणी आणि भाऊ कॉलेज student...रेवा 10 वी पास झाली  कॉलेजला एडमिशन घेतली थोड्या काळातच मित्र मैत्रीणी  झाल्या..... त्यातच  रितेश नावाचा मुलगा होता. मीडियम उँचीचा , कुरळे केस असणारा, गोरा  रंग,सदा हसतमुख आणि चेहऱ्या ने अतिशय  इनोसेंट दिसणारा रितेश सगळ्या ग्रुपचा अल्पावधीतच लाड़का बनला. साधारण 12 वीला असताना रितेश ने रेवाला प्रपोज केल... तीने लगीच होकार दिला नाही...12 विची  परीक्षा झाली  आणि तिने रितेश  ला होकार दिला.... मज़ाक मस्ती करत  कॉलेजचे ते सोनेरी दिवस संपले. रेवा तशी practical करियर, फ्यूचर याबाबतीत थोड़ी particular होती. रितेश अजूनही अवखळ अल्लड असाच  होता . वडिलांची travel agency आणि आईचे private टूशन  आणि हा एकुलता एक मुलगा. यात  जबाबदारी त्यानी कधी घेतलीच नाही. शिक्षण  पूर्ण झाल दोघही जॉबला लागले private जॉब त्यामुळे पगार एवढा नव्हता. आता रेवानी घरी सगळ सांगण्याचा निर्णय घेतला. तिने रितेशलाही सांगितल तू तुझ्या घरी  आपल्या विषयी कल्पना दे. दोघांनी घरी सांगितल मुलगा चांगला आणि जातीतलाच  असल्यामुळे विरोध नाही झाला. साखरपुड़ा  पार पड़ला.  लग्ना ची साधारण दिवाळी नंतर ची तारीख काढली. लग्न झाल नवीन सुनेच खूप कोडकौतूक झाल.संसार  चालू झाला.
वर्ष झाल दोन वर्ष झाली छान चालू होत सगळ.... नंतर  नंतर  एक एक बिनसायला लागल तिच या दोन वर्षात  2 वेळा मिसक्यरेज झाल होत... तरी ती त्याच्या सोबत निभावत होती.... आता लग्नाला 5 वर्ष झाली होती तिच जवळ जवळ 7 वेळा मिसक्यरेज झाल होत आता डॉक्टरानी सांगितल होत की रेवा आई होऊ शकणार नाही.... एका क्षणात सगळ संपल होत.आधी कसतरी टिकवून धरलेल नात आता आता खूपच दुरावल गेल.तो घरात थांबतच  नव्हता त्याच्या बिल्डिंग मधल्याच एका मुलीशी  त्यानी अफेयर केल. ती एकटी पडली  होती...तिच्या वर विनाकारण संशय घेणे, तिला लागेल असे बोलण चालू झाल. ती आणि तिच्या घरातले श्री कलवतीआईंचे भक्त कधी मंदिरात  गेली तरी तिला संशय घेऊन बोलण अश्या गोष्टी चालू झाल्या .  या 5 वर्षा दरम्यान बऱ्याच गोष्टी घड़ल्या  होत्या...भावचे लग्न झाल होत, तिचे वडील expired झाले होते.
ती सगळ्या त्रासाला कंटाळून ती भावाकडे आली.भाऊ आणि वाहिनी खूप छान बघत होते तिला,आई पण काळजी घेत होती.भावाच्या व्यवसायात ती मदत करत होती त्याबरोबरच ती जॉब पण शोधत होती.भाऊ वाहिनी होतेच पण त्यांच्यावर तिला भार  टाकायचा नव्हता. एका प्राइवेट कंपनीत तिला जॉब मिळाला.साधारण वर्ष उलटल असेल तिच्या नात्यात ही बातमी पसरली  तिच्या मोठ्या   आत्त्याच्या मिस्टरानी त्यांच्या घरी जाऊन तिच्या पुनर्विवाहा विषयी विचारले  सुरवातीला तिला वाईट वाटले पण त्यानी समजवून सांगितले  की " तुझ्या पुढे आयुष्य आहे भाऊ वाहिनी, आई आहेतच पण तुझ  म्हणणार काळजी घेणार कोणीतरी पाहिजे ", तेव्हा ती खूप रडली. तिच्या भावाला ही या गोष्टी पटल्या त्यानी पण या विषयी पुढाकार  घेतला. विवाह मंडळात नाव नोंदवल. रेवा दिसायला सूंदर होती पण ती कधीच आई होऊ शकत नाही  ही दुखरी  बाजु आड़ येत होती खूप चांगली  चांगली स्थळ तिला येत होती पण म्हणतात "ना दुधानी पोळलेला ताकसुद्धा फूंकून पितो "तस काहीस झाल तिने निर्णय घेतला की सर्वसाधारण  कुटुंबातला मुलगा बघायचा. झालही तसच तिला सचिन भेटला त्याची बायको काही करणानी त्याला सोडून गेली होती त्याला एक 6 वर्षाचा  मुलगा होता.सचिन एकुलता एक त्याचे आई वडील गावाकडे राहत होते. सचिन दिसायला सर्वसाधारण होता त्याचा मुलगा अर्णव खूप गोड होता.
अगदी साधेपणानी सचिन आणि रेवा च लग्न झाल. अर्णवला रेवा आपल्या मुलासारख संभाळत आहे.त्याला चांगले संस्कार देण, त्याचा अभ्यास घेणे,शिस्त लावण, त्याला इतर क्लासला सोडण आणन ही जबाबदारी ती लीलया पार पाडत आहे. जे तिने भोगल त्यातून कुटुंबाच्या मदतीने ती बाहेर पडली.
आयुष्यात हरु नका मित्र मैत्रीणीनो  हे ही दिवस जातील खंबीर रहा " रेवा " सारख. तुम्हालाही मार्ग मिळेल. एवढेच म्हणेन " फिटे अंधाराचे जाळे झाले  मोकळे आकाश  "

Comments

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....