सावध हरिणी सावध ग

सावध हरणी सावध ग

 Blog लिहायला सुरवात  केलिए खर...... विषयही ' स्त्री'हा निवडला खुप विचारांची गर्दी झाली  कारण  बघायला  गेल तर विषय  तसा सोपाही आहे आणि अवघड़ही......स्त्री ला समजण इतक  सोप नाही......ही स्त्री आपल्या अवती भावतिचीच  असणार  आहे.... चला  तर सुरवात  करुयात.... 👍🏻

       आजची  जी स्त्री आहे तीच  नाव "असावारी " माझ्यासोबत बस  ने प्रवास करणारी.तीच ऑफिस माझ्या ऑफिस च्या शेजारच्याच  बिल्डिंग मध्ये होत  रोज एकत्र प्रवास करताना  तोंड ओळख  झाली  आणि मग गर्दी असताना एकमेकीन साठी जागा  पकड़न वैगरे  चालू झाल....ओळख  मैत्रीत बदलली...

      असावरीच्या घरी आई -वडील, बहिण आणि  लग्न झालेला भाऊ आणि त्याची एक 5 वर्षाची  मुलगी.... सगळ छान चालेल  बहिणी च लग्न ठरल  तस  लगीन घाई  चालू झाली...खरेदीची लगबग सुरु झाली. खरेदीला  बहिणी सोबत  असावरी जाऊ लागली अशीच  खरेदीला  गेली असताना एका लेडीज स्टोअरमध्ये  जिथे  सगळे सामान एकाच  छता खाली  मिळायच अगदी हेयरपिन पासून ते चप्पल, ड्रेस पर्यंत.तिथे तीच सलग 2 ते 3 वेळा जाण झाल. तिथल्या  स्टाफ शी  बऱ्यापैकी  आता ओळख  झालेली . तिथल्या  मैनेजर अहान शी  पण चांगलीच ओळख  झाली... दिसायला सावळा पण स्मार्ट, उंच आणि बोलण इतक मधाळ की सहज़  कोणीही भूलेल अस व्यक्तिमत्व..... मग स्पेशल  डिस्काउंट वैगरे  स्कीम मिळू लागल्या मग कोणा मैत्रीणी ला खरेदी  करायची  म्हंटल की त्याच दुकानात जाऊ लागले. दरम्यान आतापर्यंत अहान सोबत नंबर  exchange झाला....

        बहिणीच  लग्न यथासंग  पार पड़ल.... दुसऱ्या दिवसापासून असावरी च रूटीन चालू झाल. तुर्तच  स्टोअर आणि  अहान चा थोड़ा  विसर पड़ला  होता.... काही दिवसानी  ऑफिस मधल्या  मैत्रीणि सोबत  पुन्हा  स्टोअर मध्ये  जाण झाल.... खरेदी  झाली.. बाहेर पडणार तोच  अहान बाहेर आला... आणि  त्यांना दोघीना  घेऊन  शेजारच्या  रेस्टोरेंट मध्ये  कॉफी प्यायला घेऊन  गेला... कॉफी घेऊन झाल्यावर मैत्रीण निघून गेली. आता असावरी बस ची वाट  पाहत  बसलेली...पुन्हा अहान तिथे  आला इतके  दिवसाची मनातील  ईच्छा त्यानी असावरीला बोलून दाखवली.... त्याला ती आवडु लागली होती.आता तिला विचार  करण्याची गरज होती.

      थोड़े  दिवस  ती ना त्याला भेटली  ना कोणताही संपर्क केला. एक  दिवस तो तिच्या ऑफिस पाशी येऊन थांबला  तिच्या घरी हे सगळे चालणार नव्हत म्हणून ती त्याला टाळत  होती. पण शेवटी ती त्याच्या प्रेमात पड़लीच.हळूहळू चोरुन भेटण चालू झाल आणि मग एक दिवस  घरी कळायच्या आताच तिने ऑफिसला जाते म्हणून निघाली आणि सोबत दोन जोड़ी कपडे  घेतले. प्रेम अंधळ असत त्याची काही माहिती घेतली नाही आणि तस जबाबदार  वयही  नाही...घरात  कोणालाच  काही माहिती नाही. इथपर्यंत आम्ही एकमेकीना भेटत  होतो.... सगळ्या गोष्टी ती माझ्याशी share करायची...

        त्याच्यासोबत ती पळून  गेली. मला  वाटल चांगल चालू असेल सगळे. मी माझ्या कामात busy झाले साधारण  महिना भरानी  आमची भेट झाली  खुप वेगळी दिसत होती. नवीन नवरी च अस काहीच नव्हत उलट उद्धवस्त दिसत होती ती. तिला विचारल्यावर समजल की त्या मुलाच  आधीच  लग्न झालेल आणि त्याला दोन छोटी मूल पण होती. हिला जेव्हा समजल  तेव्हा तिच्या पायाखालची  ज़मीनच  सरकली. त्याच म्हणण होत की पहिली बायको खुप त्रास देते म्हणून मी तुज्यावर प्रेम केल कशीबशी  ती त्याच्या तावड़ित राहिली आईवडिलां कड़े जायची सोय नव्हती कारण त्यांना न सांगता तिने हे लग्न केलेल पण त्याचे अन्याय आणि पहिल्या बायकोचा त्रास भांडण  तिला सहन होईना. ती पुन्हा जॉब चालू करावा म्हणून ऑफिस मध्ये आलेली  पण सध्या तिच्या जागी दूसरे च कोणीतरी appoint केलेल. आता काय कराव अस तिला प्रश्न पड़लेला तिला म्हंटल तू आई वडिलांकडे  परत जा त्याच्या इथे राहशील  तर हाल होतील... तस ती आई कड़े राहायला गेली....

  परत खुप दिवस  आमची गठभेट  नव्हती अशीच एकदा बस ला भेटलेली . कस काय विचारल्यावर म्हणाली सध्या आई कड़े असते नवीन ऑफिस join केलाय आई वडील नीट बोलत नाहीत भाऊ आणि वाहिनी कामापुरत  बोलतात. नवीन ऑफिस चा पत्ता त्याला कुठून मिळाला काय माहिती आता तिथे येऊन सुद्धा तो त्रास देतो. दरम्यान आइवडिलांना तो भेटला पण त्यांना म्हटला मी पहिल्या बायकोला divorse देणारे . कधी कधी रस्त्यात पण मारहाण करतो. आणि माझ लग्न दुसरीकडे जमायला लागल की याला कुठून कळत  काय माहिती तिथे येऊन लग्न मोडतो. खुप त्रासली होती ती त्याच्यापासून. कुठून प्रेम केल अस तिला वाटायला लागल होत.

   त्यानंतर आजपर्यंत  आमची भेट नाही झाली आज ती कुठे आहे कशी आहे काही माहिती नाही.... पण या फसव्या प्रेमाची ती बळी  ठरली होती... हे मात्र नक्की...... " असावरी  "ची ही  story आठवली  की एकच गाण आठवत  " सावध हरिणी  सावध  ग.... करील कुणी तरी पारध ग...."

प्राज.....

     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....